रशियामधील अलास्का विक्री करार

By @vedvati3/1/2020laska

गेली कित्येक दशके जरी रशिया आणि अमेरिका हे देश एकमेकांचे कट्टर शत्रू असले तरी सुमारे १५० वर्षांपूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. ह्या दोन देशांमध्ये तेव्हा मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच काळामध्ये रशियाने एक अशी चूक केली ज्याला इतिहासातील सर्वांत महागडी चूक बोलले जाऊ शकते. ती चूक म्हणजे अलास्काची विक्री. तुम्ही बरोबर वाचता आहात. आता जरी अलास्का हा अमेरिकेचा भाग असला तरी त्या काळी तो रशियाच्या अधिपत्याखाली होता.

कित्येक लोकांना ठाऊक नसते पण अमेरिका आणि रशिया मध्ये केवळ अडीच मैल किंवा ४ किलोमीटर एवढेच अंतर आहे, अलास्का हा प्रदेश अमेरिकेच्या संघराज्याच्या भाग असला तरी रशिया पासून त्याचे अंतर काही मैलांचे आहे म्हणूनच रशियाकडे या प्रदेशाची मालकी होती.
हा विषय सध्या चर्चेला  येण्याचे कारण म्हणजे अलास्कामधून अमेरिकेला मिळणारा प्रचंड पैसा आणि उत्पन्न. 
हे उत्पन्न आज खर तर रशियाचे असायला हवे होते.
अलास्काची खरेदी अमेरिकेला चांगलीच फायद्याची पडली, किरकोळ किमतीत विकत घेतलेल्या या भू प्रदेशात नंतर अमेरिकेला अनेक नैसर्गिक खनिजांचे साठे सापडले पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आज अलास्का हे पृथ्वी तलवारच स्वर्ग बनला आहे, पर्यटकांचे आकर्षण बनत चालला आहे, आज पर्यटनाच्या उत्पन्नामुळे अलास्का हा समृद्ध प्रदेश बमला आहे
alaska.jpg

27

comments